Ad will apear here
Next
उत्कृष्ट कामगिरी केलेल्या दोन ग्रामसेवकांचा सत्कार
पालघर : पालघर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पालघरमधील संकुल सभागृहात पार पडली. पालघर जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत दोन ऑक्टोबर २०१४नंतर शौचालय बांधकाम करण्यात आलेल्या कुटुंबांचे फोटो केंद्र सरकारच्या वेबसाइटवर अपलोड करण्याला गती देण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील १०० टक्के शौचालयांचे फोटो अपलोड केलेल्या वसई तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक एस. आर. मोरे. यांचा सत्कार जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखाताई थेतले यांच्या हस्ते सन्मानपदक देऊन करण्यात आला. पालघर तालुक्यातील ग्रामपंचायत गोवाडे येथील ग्रामसेवक सतीश भागवत यांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्या निता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पालघर जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींमधील शौचालयाचे १०० टक्के फोटो अपलोड ग्रामसेवंकानी आदर्श निर्माण केला आहे. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा, उपाध्यक्ष, सदस्य सर्व विषय समित्यांचे सभापती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZMEBD
Similar Posts
हत्तीरोगविरोधी एकदिवसीय औषधोपचार मोहिमेबाबत समन्वय समितीची बैठक पालघर : हत्तीरोग निर्मूलनासाठी महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम २६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या संदर्भात पालघर येथे २० जुलै रोजी जिल्हा समन्वय समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यामार्फत घेण्यात आली. यात या मोहिमेतील नियोजनाचा आढावा घेण्यात आला
पालघर जिल्ह्यात होणार शाळांचे समायोजन पालघर : सहअध्ययनाने शैक्षणिक गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होते. पालघर जिल्ह्यामध्ये पायाभूत पदांनुसार ६६५ पदे रिक्त असल्याने दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. शाळा समायोजित केल्यास त्यामधील अतिरिक्त शिक्षकांना रिक्त पदांवर सामावून घेऊन, शिक्षकांचा प्रश्न काही प्रमाणात मिटण्यास मदत होणार आहे
पालघर जिल्ह्याचा तृतीय वर्धापनदिन उत्साहात पालघर : जिल्ह्याचा तृतीय वर्धापनदिन जिल्हा परिषदेमार्फत उत्साहत साजरा करण्यात आला. या वेळी ‘आनंदी ऑगस्ट’अंतर्गत विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाभरात दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वच्छता प्रभात फेरी काढून हा दिवस साजरा केला. या वेळी शिक्षकांनी स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर जनजागृती केली
जागतिक लोकसंख्या दिन समारंभ पालघर : जागतिक लोकसंख्या दिन म्हणून ११ जुलै हा दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्ताने पालघर जिल्ह्यात ११ ते २४ जुलैदरम्यान आरोग्य संस्थांमार्फत लोकसंख्या स्थिरता पंधरवडा राबविण्यात येत आहे. ‘जोडप्यांनी जबाबदारी स्वीकारावी, कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब करावा’ हे या वर्षासाठीचे घोषवाक्य आहे. ‘वाढती लोकसंख्या हा विकासातील मोठा अडथळा आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language